| फ़सवूण आज गेले, सारेच पावसाळे |
| भोगावयास आले, नुसतेच हे उन्हाळे. |
| मेल्यावरीच येतो पाऊस आसवांचा |
| जगण्यात सांग कोठे लपतात हे जिव्हाळे? |
| वाकून चाल तू ही, लढण्यास जिंदगीशी |
| पाण्याखाली विनम्र झुकती जसे लव्हाळे. |
| नेकीने चालतो ही, सत्याची वाट अवघी |
| माझाच जीव मजला तरी पुन्हा न्यहाळे |
| जाता बुडूनी सांज पोटात सागराच्या |
| माझे अबोल गाणे पाण्यावरी खळाळे. |
No comments:
Post a Comment