जे व्हायचे ते घडून गेले |
इथे पावसाळे रडून गेले. |
कोण वाचतो शब्दास आता |
ज्ञान ग्रंथात सडून गेले. |
घातले दाणें जरी मुठीने |
उपाशीच पक्षी उडून गेले. |
माझी मी दिली कुर्हाड ज्यांना |
माझ्याशीच ते लढून गेले. |
रक्तावर पोसले तरु जरी |
पानगळीत हे झडून गेले. |
गर्दीत पाहीले सोयरे जे |
नजरे समोरच दडून गेले. |
किती सावरावं प्रत्यकाला? |
No comments:
Post a Comment