वेगळे ना
व्हायचे होते मला |
स्वत:सच जोखायचे होते मला |
|
गर्दीत ही गेलो नाही मी कधी |
एकांतात जगायचे होते मला. |
|
कुणाशी ना बोललो तरी येथे |
नसून मी असायचे होते मला. |
|
दु:ख माझे सांगू मी कसे तुला? |
वेदनेत हसायचे होते मला. |
|
आजन्म हा तुजसाठी झिजवूनी |
मजसाठी उरायचे होते मला. |
|
चुकूनी मी वाट आलो स्मशानी |
माणसातच जायचे होते मला. |
|
स्वत:सच जोखायचे होते मला |
|
गर्दीत ही गेलो नाही मी कधी |
एकांतात जगायचे होते मला. |
|
कुणाशी ना बोललो तरी येथे |
नसून मी असायचे होते मला. |
|
दु:ख माझे सांगू मी कसे तुला? |
वेदनेत हसायचे होते मला. |
|
आजन्म हा तुजसाठी झिजवूनी |
मजसाठी उरायचे होते मला. |
|
चुकूनी मी वाट आलो स्मशानी |
माणसातच जायचे होते मला. |
No comments:
Post a Comment