लहानांसाठी कधी मने, करुन फ़ूलांची लहान व्हावे |
उपकाराचे हात देऊन, मरणा अंती महान व्हावे. |
सुख दु:खाची करुन वारी, गाणे येईल तुमच्या दारी |
मंतरलेल्या शब्दांसाठी, कधी गाण्याची तहान व्हावे. |
झाडाला कधी नसते दु:ख, काळजाला सांगून द्यावे |
अन्यायात कधी दुर्बलांच्या तलवारीची सहाण व्हावे. |
सांग कथा ती प्रत्यकाला, जय नावाच्या पराजयाची |
लढणार्यास ही मौनाची भाषा त्यांची आव्हान व्हावे. |
ना देता आले सुख कधी, तरी द्यावे असे दिलासे की, |
आनंदाच्या अश्रूमध्ये सवंगड्याचे नहाण व्हावे. |
-------------------------------------------------- |
कठिण शब्द येता :----- |
.......................... |
सहाण = धार लावण्याचा दगड. |
जय नावाचा पराजय = महाभारतावरील विष्लेशक कथेचा संदर्भ. |
-------------------------------------------------- |
Friday, September 14, 2012
मने करुन फूलांची......!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment