| तू असा आहेस, तू तसा आहेस, |
| मतानुसार जो तो बोलला. |
| पण पुरेपूर कोण ओळखतो कुणाला? |
| कधीतरी सांगता येईल तुला? |
| कोणता रंग असतो उन्हाला? |
| निदान, हे तरी सांग मला! |
| आयुष्याचा कोण झुलवतो झुला? |
| नाव हीच ओळख असते प्रत्यकाला, |
| तसा पुरेपूर कोण ओळखतो कुणाला? |
| इथे तर माझाच मी ओळखत नाही मला. |
No comments:
Post a Comment