| सांजकाळी कशी दाटते,मनात माझ्या हुरहूर. |
| कुण्याकाळचा फ़िरुनी येतो,जुन्या स्मृतींचा पूर. |
| सागराची लाट जणू रुद्र त्सूनामी वादळाची |
| किती आवरू किती सावरू सये फ़ुटून जातो उर. |
| दिलीस जेंव्हा हसूनी मजला खोटी वचने तेंव्हा |
| स्वप्नभूलीत घोड्यानेही चौखूर उधळले खूर. |
| नेहमीच असतो तसाच आहे आजही येथे मी |
| तरी आरसा कशास दावी हा जगावेगळा नूर |
| भूत-भविष्या मध्ये अडकला,क्षणभराचा वर्तमान |
| किती चाललो तरी रिकामा वाट जाते दूर दूर. |
| मुक्या जिवाचा मुक्या मनाशी मुकेपणी रोज तंटा |
| कधी यायचा तुझ्या नि माझ्या गाण्याला एक सूर. |
| किती चाललो जपून होतो तरीही लागली ठेच |
| नशीब मेले असेच जाते देऊन हतावर तूर |
| कुणी कसेही बोलून गेले नि दिले जिव्हारी घाव |
| किती भोगले अन सोसले असताना मी बेकसूर. |
Friday, September 14, 2012
सांजकाळी कशी दाटते
Labels:
कविता
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment