एक वाट तुझी एक वाट माझी, |
दिठीतल्या आसवां सुख नसे राजी. |
एक हाक तुझी एक साद माझी, |
भेटताना क्षितीजे ही भासतात खुजी. |
एक क्षण तुझा एक क्षण माझा |
क्षणाच्याही सुखासाठी असुसला राजा |
एक हात तुझा एक हात माझा |
भेटताना ऋतूं गंध दरवळेल ताजा. |
एक स्वप्न तुझे एक स्वप्न माझे, |
कसे आवरावे हे वास्तवाचे ओझे? |
No comments:
Post a Comment