साहित्य प्रकार

Tuesday, November 30, 2010

भूल  
मंद पावसाचा 
रुणुझुणु ताल
नाद पैंजनाचा
तुझे  मित बोलं.


आभालात  माझ्या
चांदण्याची झुलं
लख्ख त्यात तू ही
एक चंद्र फुलं. 

माझी कविता

मुखवटय  आड
हिजद्यांचे आपले बारे असते 
त्यांना राजकारण नसते   .
               मग राजकारणात एवढे काय  असते?
तिथे   टोपिवाल्या कोल्ह्यांचे गाव असते,
उसाचे  भेंड त्यांनी खायचे आणि ते ,
तुम्ही आम्ही निस्तरायाचे असते......................................! 

माझी कविता

गणित 
मी आकडेमोड करत गेलो आणि,
हातचे वाढत राहीले.


छेदकाना चकवे देऊन ,
अंकांचे गुणाकर ही खुप शिकले.
तरी ठागांच्या डावात ,
एका पांचाली साठी...
धर्माचे  सारे राज्य गेले..........!

माझी कविता

बैरागी 
वैशाख उन्हाचा वणवा,
दरी माझ्या येतो 
संध्येचा बैरागी मी ,
मज चन्द्र कोरता येतो.

माझी कविता

उद्या मी .......!
आजचा मी उद्या नसेन,
नवा  दिवस मी ही नावाच असेन,


विझून  गेले दिवे आणि,
उध्वस्त झाले रान तरी,
उजेडाचा आभास मी कलोखाचा चन्द्र असेन.