| खरी कहाणी विदुषकाची विकल होती |
| राजा होणे राजाचीही नकल होती |
| फ़ितूर झाले माझेच प्यादे आज इथे, |
| तशी न कोणत्या फ़िरंग्यांची मजल होती. |
| खरे सांगतो पराभूत मी तिथे झालो. |
| जिथे माझ्य़ा छाव्यांची नजर अचल होती. |
| पाय ठेवला विश्वासाने मी जिथेही |
| तिथे मानवी किड्यांची ही दलदल होती. |
| लढत रहाण सतत रणांगणात जिवनाच्या |
| हिच माझ्या आयुष्याची खरी गझल होती. |
No comments:
Post a Comment