| ना माणसात माणूस, ना घरात घरपण उरले |
| का अश्मयुगाचे पुन्हा, हे आदिम वारे फिरले? |
| बगल देऊनी जाती, ते सगे सोयरे सारे |
| नात्यांचे तरी धागे, मी उगाच ताणून धरले |
| अंक नाटकासारखे, हे जगणे तुझे नि माझे |
| ऐलापासून पैला, जग सोंगाड्यांनी भरले |
| ना आभाळ माझे हे, ना तुझे चांदणे तेही. |
| आलो होतो मोकळे, अन तसेच जाणे ठरले. |
| ते गीत सुधाकरीचे का कुणास नाही कळले? |
| गाणार्याचे गीतही, का असेच जगणे सरले? |
No comments:
Post a Comment