| जसं तू शिकवलंस, तसं आई जग नाही. |
| तुझ्यातल्या कष्टाची कुणातही धग नाही. |
| ओलांडल्या किती जरी, अवकाश्याच्या सिमा |
| तुझ्यासमान कुठेच अम्रुताचा ढग नाही |
| कोसळले जर अभाळ, सहज पेलण्यासाठी |
| तुझ्या इतके माझे मन अजून सजग नाही. |
| अवती भोवती फ़िरतात, दिलाश्याची भुते |
| पण तुझ्या जागी इथे कुणाचाच तग नाही. |
No comments:
Post a Comment