पुढच्याला मागे खेचनारे आम्ही |
विजेत्यांचे नांगे ठेचनारे आम्ही |
नाही कुठेच आमच्या हक्काचा बाग |
दुसर्याचीच फ़ूले वेचनारे आम्ही. |
बुध्दीने काढतो निर्बुध्दांची सोंगे |
अध्यात्माला दूर फ़ेकनारे आम्ही. |
आम्हासाठी आणेल घबाड त्याच्या |
सरणावरी हात शेकनारे आम्ही. |
अंगात आमच्या बाणा कर्तव्याचा |
दुबळ्यांची बोटे चेपनारे आम्ही. |
No comments:
Post a Comment