हे असं नेहमीच कसं जादूमंतर होतं |
सारं ज्ञान वेळ निघून गेल्यानंतर होतं |
तो समाज ही एक आरसा होता भिववणारा |
तसं तुझ्या माझ्यात ते कितीसं अंतर होतं? |
त्या दिवशी तू पहीलेलं अतीभव्य वादळ |
हे देखिल माझ्याच मनाच एक अवांतर होतं |
आणि आज पहाटे मी पाहीलेलं ते स्वप्न |
हे तुझ्या येण्यासारखच काव्यमंतर होतं. |
काळीज पोखरुन स्वप्नांनीच जागा केली |
तसं तुझ्याशिवाय हे जगणंच निरंतर होतं. |
या भरल्या कळपातून कुठेतरी दूर जाणं |
हेच फक्त आता शेवटचं गत्यंतर होतं . |
Friday, September 14, 2012
अंतर
Labels:
कविता
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment