तुला खरं सांगू का? |
मी अंधारात असलो तरी, |
शब्दच विजा घेऊन येतात. |
अन माझी चराम आसवं |
ओळी ओळीत लखलखतात |
मी नेहमीच हसतो, |
याचं तुला नेहमीच कोडं! |
पण तुला का ठाऊक, |
मनात असतं दु:खही थोडं |
लोक म्हणतात मला, |
मी जगावेगळा वेडा, |
पण खरे कुणास ठावे? |
मी तर एक पुस्तकी किडा. |
आता तू म्हणशील, |
काय खरं नि काय खोटं! |
माणसं तर जगतात, |
भरायला नुसती पोटं. |
कधी कुणी म्हणतं |
सत्य ही असतं खोटं |
यावर तुच सांग आता, |
किती वाजवायचं मी |
उगा सत्याचं धोटं |
Friday, September 14, 2012
धोटं
Labels:
कविता
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment