चल!.. आज नव्या वाटेने जाऊ, |
जिथे असतील कळ्या ही उत्सूक, |
गंध सांडून फूलण्यासाठी. |
काट्यांचं ही दु:खं विसरून, |
तुझ्या माझ्यासाठी. |
अंगावर ऊठवाया पावलांची नक्षी, |
अतूर असतील वाटा, |
अन उर फोडून नाचत असतील, |
ओढ लागलेल्या पाणलाटा. |
खाली वाकलं असेल आभाळ, |
जिथे रंग निळा घेऊन, |
फक्त तुझ्या माझ्यासाठी. |
तेथेच घडूदे आज एकदा |
या हृदयाच्या गाठीभेटी. |
ओसाड असलं रान तरी, |
जे देईल अंतराची हाक |
अनवाणीच जाऊ तिथे, |
पावलावरती पाऊल टाक. |
गुंतवून घेऊ पायात, |
आडव्या तिडव्या वाटा, |
रुतला जरी काटा, |
वहिवाटेला देऊ फाटा. |
मिसळून जाऊ एकमेकात, |
स्वच्छ उन्हाच्या मृगजळात. |
सावल्या ठेवू कोरून, |
भिरभीरणार्या डोळ्यात. |
आभाळाचा संधीप्रकाश |
असेल जिथे गोठलेला. |
गाणे गात जगत असेल, |
अश्वथ ही पिळवटलेला. |
चल.. जाऊ आज तिथे, |
जिथे येईल मेघ उतरून, |
गंध घेऊन सौख्याचा. |
अन दु:खाचे ही गीत होऊन, |
गाव लागेल आनंदाचा. |
Friday, September 14, 2012
अज्ञाताच्या वाटेवर...........!
Labels:
कविता
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment