हृदयाच्या त्या शब्दासाठी हरवून सारे भान. |
होते कधीचे अतुरलेले माझे हळवे कान |
अवचित आले तुझ्याकडूनी होकाराचे दान |
आणि माझ्या मनात फ़ुलले गुलमोहराचे रान |
तुझ्या वाचुनी भासत होती सृष्टी ही निशप्राण |
तुला पाहता चराचराला क्षणात आला प्राण |
रुप आगळे तुझे साजणी लावण्याची खाण |
लपून पाहे फ़ूलांअडूनी वेलीवरचे पान. |
कशास करशी रुप सोहळे,लावूनी दिपमाळ? |
उठून दिसते चांदण्यात ही तुझे चांदणी वाण |
वाजत येई वाटेवरूनी ऋतू ऋतूंचे गाण |
आपण दोघे सहप्रवासी दिगंतराचे छान |
कशास करशी उगाच चिंता हरून सारे त्राण? |
जगणे माझे तुझ्याचसाठी शतजन्माची आन. |
काळजात या अजून आहे तुझ्या स्मृतींचे पान |
गतकाळाचे क्षण गुलाबी मांडून बसले ठान |
असेल कोण राजा त्याचा ताज असूदे महान |
भातुकलीची दिवली सुध्दा अमर प्रीतीची शान |
लक्ष फूलांनी जरी बहरले दिशा दिशांचे रान, |
आधी वेचण्या सुधाकरी फूलराणीचा मान. |
Friday, September 14, 2012
गुलमोहराचे रान
Labels:
कविता
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment