साहित्य प्रकार

Friday, September 14, 2012

मेरी बात रही मेरे मन में


आयुषात कधी कधी अचानक आपल्याला अनोळखी असे कोणीतरी सहप्रवासी म्हणुन भेटते.आणि हा सहप्रवास चालू होतो तशी ओळख देखिल वाढत जाते. व ध्यनी मनी नसताना अत्तापर्यंत वेगवेगळे असलेल्या दोन जीवनगाण्याचे सूर जुळू लागतात. कालांतराने या ओळखीचे रुपांतर दृढ स्नेहाच्या मैत्रीत होते. मग रोजच्या व्यवाहारात आपण एकमेकांची सुख दु:खे वाटून घेऊ लागतो. अडीअडचणीत एकमेकाला मदतीचा हात देऊ करतो. आणि हळुहळू या क्षणमात्र प्रवासाची अविट गोडी वाढत जाते. ओळखीच्या झालेल्या त्या अनोळखीचा प्रवास अता नेहमीच हवा हवासा वाटू लागतो. दोघांतील कुणाच्यातरी अंधारलेल्या आयुष्यात कधी न्हवे ते टिपूर चांदणे उगवून येते. रोज रुसणारे ऋतू आज हसणारी फ़ूले घेऊन येतात आणि सारं आयुष्यच कसं बहरून जात. परंतू आपल्या आसुयेनं बरबटलेल्या नियतीला नेमकं हेच नको असतं. कोणतही नातं कितीही दृढ झालं तरी आपलं वैयक्तिक, वेगळं, स्वत:च असं एक जग असत की, ज्यामध्ये आशा काही गोष्टी असतात की त्या आपण इतर कोणालाही सांगू शकत नाही. आणि ज्या कोणाला खरेच सांगायचे असते ती व्यक्ती आणि सांगण्याची वेळ नियती कधीच जुळू देत नाही. मनात तर खुप काही गजबजलेलं असतं. आत खोल कुठेतरी एक अनावर भावकल्लोळ माजलेला असतो. आणि नेमका याच वेळी सहप्रवासही संपलेला असतो. अत्तापर्यंत आपल्याच नकळत मनात घर करून बसलेलं कोणीतरी जायला निघतं. त्याला हसर्‍या चेहनं निरोप द्यायची वेळ येते. पण हसनंच कुठे हरपलेलं असतं. आणि निरोपाच्या क्षणी हे मन मोकळ करणं केवळ अशक्य असतं. अता वेळ निघून गेल्यावर बोलण्यात ही काही अर्थ नसतो.
मन कसं अगदी सैरभैर होतं. आपण भानावर येण्याधीच, जाणारा तो आपल्या वाटेने चार पावले पुढे निघूनही गेलेला असतो. आपण शिताफ़ीने चेहर्‍यावर हसू आणत एक हात उंचावून निरोप देऊ लागतो. पण व्याकूळलेल्या मनात मात्र विरहाचे थेंब पागोळ्याप्रमाणे ठिबकत असतात.......

मेरी बात रही मेरे मन में,
कुच्छ केहेना सकी उलझन में ।
मेरे सपने अधूरे, हुये नही पुरे,
आग लगी जीवन में ।
मेरी बात रही मेरे मन में........

ओ रसीयॉं मन बसीयॉं,
नसनसमें हो तुम ही समायें
मेरे नयना करे बैना,
मेरा दर्द ना तुम सुन पायें ।
जिया मोरा प्यासा रहा सावन में ।
मेरी बात रही मेरे मन में........

कुच्छ केहेते, कुच्छ सुनते,
क्युं चले गये दिल को मसल के?
मेरी दुनिया हुइ सूनी,
बुझा आस का दिपक जल के
छाय रे अन्धेर मेरि अखियन में
मेरी बात रही मेरे मन में................

... शकील बदायुनीचे शब्द, आशाचा दर्द भरा आवाज आणि हेमंत कुमार यांच हृद्द करणारं संगीत.                        (चित्रपट- साहब बिवी और गुलाम-गुरुदत्त)

या गाण्याला त्याच्या आशया इतकाच वहिदाचा भावव्याकूळ चेहरा लाभला आहे. गाण्याचा संवेदनशील कान असणार्‍या प्रत्यकालाच हे गाणे ओतप्रोत आनंद देऊन जाते. इथे एका विरहानं उसवलेल्या मनाच्या कितीतरी आवस्था चित्रमयपणेच रेखाटल्या आहेत. शेवटी असाह्य होऊन ती प्रेयसी म्हणते....

तुम आओं.. की, न आओं
पिया याद तुम्हारी मेरे संग है ।
तुम्हे कैसे..., ये बताऊ
मेरे प्रीत का निराला इक रंग है।

... काहीतरी कायमच हरवून गेलं आहे. आणि येणार्‍या भविष्याचा प्रत्येक दिवस केवळ आठवणीवरच जगायचा आहे. किती अवघड असतं हे जगणं, नाही का?

वेदनांचा भारगाडा...


नागमोडी वाट झाली चालता ही येत नाही
चालतो ती वाट आता, सोडता ही येत नाही.

वेदनांचा भारगाडा ओढता ही येत नाही.
भालरेषा ही अभागी, खोडता ही येत नाही.

दावलेसी तू कशाला इंद्रधनुचे रंग सारे?
भंगलेले स्वप्न आता, जोडता ही येत नाही.

गोवलेसी तू कशाला रेशमाचे बंध येथे?
बांधलेला जन्म आता, तोडता ही येत नाही.

काळ गेला डाव आला खेळता ही येत नाही
मांडलेला खेळ आता, मोडता ही येत नाही.

आसवांना पापणीत पेलता ही येत नाही
साचलेला आत टाहो, फोडता ही येत नाही.

वेगळे ना व्हायचे होते मला


वेगळे ना व्हायचे होते मला
स्वत:सच जोखायचे होते मला

गर्दीत ही गेलो नाही मी कधी
एकांतात जगायचे होते मला.

कुणाशी ना बोललो तरी येथे
नसून मी असायचे होते मला.

दु:ख माझे सांगू मी कसे तुला?
वेदनेत हसायचे होते मला.

आजन्म हा तुजसाठी झिजवूनी
मजसाठी उरायचे होते मला.

चुकूनी मी वाट आलो स्मशानी
माणसातच जायचे होते मला.
स्वत:सच जोखायचे होते मला

गर्दीत ही गेलो नाही मी कधी
एकांतात जगायचे होते मला.

कुणाशी ना बोललो तरी येथे
नसून मी असायचे होते मला.

दु:ख माझे सांगू मी कसे तुला?
वेदनेत हसायचे होते मला.

आजन्म हा तुजसाठी झिजवूनी
मजसाठी उरायचे होते मला.

चुकूनी मी वाट आलो स्मशानी
माणसातच जायचे होते मला.

राजा होणे राजाचीही नकल होती


खरी कहाणी विदुषकाची विकल होती
राजा होणे राजाचीही नकल होती

फ़ितूर झाले माझेच प्यादे आज इथे,
तशी न कोणत्या फ़िरंग्यांची मजल होती.

खरे सांगतो पराभूत मी तिथे झालो.
जिथे माझ्य़ा छाव्यांची नजर अचल होती.

पाय ठेवला विश्वासाने मी जिथेही
तिथे मानवी किड्यांची ही दलदल होती.

लढत रहाण सतत रणांगणात जिवनाच्या
हिच माझ्या आयुष्याची खरी गझल होती.

शब्दांच्या मी वादळातला एक नारा.


अमृताच्या पैजा मी गा जिंकणारा.
शब्दांच्या मी वादळातला एक नारा.

माणसात मी माणसाला शोधणारा
गर्दीच्या मी ढगा आडचा एक तारा.

अनाठायीच मांडला मी हा पसारा
जीवन आहे स्वप्नांचाच खेळ सारा.

विनासुखाचा कशास ये जन्मफ़ेरा
दु:ख घालते घडीघडीस येरझारा.

कश्या सावरू उरातल्या या त्सूनामीं ?
डोळ्यांमधल्या सागरास कुठे किणारा.

काय फ़ायदा पेटवूनी या मशाली?
डोळसांच्या अंधाधुंदी कारभारा

दुनियेमध्ये भिड माजली असत्याची
सत्याचाच रोज होतो कोंडमारा.

मना मनात आहे धुके दाटलेले


मना मनात आहे धुके दाटलेले
ओठांत एक गाणे मुके गोठलेले.

कळपामध्ये जे ही मला भेटलेले
न्हवते कुणीच वेडे, वेड घेतलेले.

दिसतात जरी हे.. चेहरे हसलेले
प्रत्यकाच्या उरात युध्द पेटलेले.

आसक्तते पोटी.. प्रेम बाटलेले
चंदा पायी एका सुर्य झाकलेले.

विश्वासाने सांग सत्य भेटलेले
अविश्वासाचे का मेघ दाटलेले?

दिसवयास सारे वरून नटलेले
हिरवे झाड परी आतून वटलेले