चंद्रबिलोर
---- S. V. GODASE
साहित्य प्रकार
कविता
(12)
गझल
(17)
चित्रपट
(1)
ललित
(2)
Thursday, December 2, 2010
रान वार हा भरारा नभ टिपूस टिपूस
रानी वनी पानोपानी , मन पाउस पाउस
Wednesday, December 1, 2010
पण नावाची भिंत
किती वाटा चुकवल्या, किती आड़े वेडे घेतले,
पण ...हा 'पण' मध्ये येताच राहीला..
न संगता न बोलता आयुष्याच्या वाटेवर,
गनिम होउन दडून बसला.
Tuesday, November 30, 2010
भूल
मंद पावसाचा
रुणुझुणु ताल
नाद पैंजनाचा
तुझे मित बोलं.
आभालात माझ्या
चांदण्याची झुलं
लख्ख त्यात तू ही
एक चंद्र फुलं.
माझी कविता
मुखवटय आड
हिजद्यांचे आपले बारे असते
त्यांना राजकारण नसते
.
मग राजकारणात एवढे काय असते?
तिथे टोपिवाल्या कोल्ह्यांचे गाव असते,
उसाचे भेंड त्यांनी खायचे आणि ते ,
तुम्ही आम्ही निस्तरायाचे असते......................................!
माझी कविता
गणित
मी आकडेमोड करत गेलो आणि,
हातचे वाढत राहीले.
छेदकाना चकवे देऊन ,
अंकांचे गुणाकर ही खुप शिकले.
तरी ठागांच्या डावात ,
एका पांचाली साठी...
धर्माचे सारे राज्य गेले..........!
माझी कविता
बैरागी
वैशाख उन्हाचा वणवा,
दरी माझ्या येतो
संध्येचा बैरागी मी ,
मज चन्द्र कोरता येतो.
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)