| लहानांसाठी कधी मने, करुन फ़ूलांची लहान व्हावे |
| उपकाराचे हात देऊन, मरणा अंती महान व्हावे. |
| सुख दु:खाची करुन वारी, गाणे येईल तुमच्या दारी |
| मंतरलेल्या शब्दांसाठी, कधी गाण्याची तहान व्हावे. |
| झाडाला कधी नसते दु:ख, काळजाला सांगून द्यावे |
| अन्यायात कधी दुर्बलांच्या तलवारीची सहाण व्हावे. |
| सांग कथा ती प्रत्यकाला, जय नावाच्या पराजयाची |
| लढणार्यास ही मौनाची भाषा त्यांची आव्हान व्हावे. |
| ना देता आले सुख कधी, तरी द्यावे असे दिलासे की, |
| आनंदाच्या अश्रूमध्ये सवंगड्याचे नहाण व्हावे. |
| -------------------------------------------------- |
| कठिण शब्द येता :----- |
| .......................... |
| सहाण = धार लावण्याचा दगड. |
| जय नावाचा पराजय = महाभारतावरील विष्लेशक कथेचा संदर्भ. |
| -------------------------------------------------- |
Friday, September 14, 2012
मने करुन फूलांची......!
कुड
| तुझं खरं की माझं खरं |
| मनाचा भुंगा जीवाला या |
| असं रोज कुरतडत राहतो. |
| सत्याचं -असत्याचं मनात |
| जुंपतं रोज तुंबळ... अन- |
| कुणीतरी अज्ञात रक्षस |
| सुखलेल्या या जख्मांना |
| पुन्हा फ़ोडत राहतो. |
| कसं ! जगावं तरी कसं? |
| बाहेरच्या या जगात |
| नाही कुणालाच कळत |
| असा मी का चिडत राहतो. |
| कुण्या जन्माच हे पाप, |
| कि, जगण्याचा हा शाप? |
| कुणी नसताना ही माझा मी |
| मलाच, का कुडत राहतो? |
अता वाकून ये आभाळा
| अता वाकून ये आभाळा |
| जराशी होईन मी निळा |
| पहातोय वाट तुझी मी |
| बनुनी अहिल्येची शीळा |
| झुंजताना मी तनकटाशी |
| इथे मोडला रे विळा |
| गेली सारी सुकून राने |
| भरु दे चांदण्याने मळा |
| गेला संपून हा प्रवास |
| आता उघडावे दार तिळा. |
| हुदयाच्या ही कैक कळा |
| तुला सांगेन मी आभाळा |
| पाहू तरी तुझ्यात आता |
| खरा आहे किती जिव्हाळा |
Thursday, September 13, 2012
जगणे म्हणजे कटकट नुसती
| जगणे म्हणजे कटकट नुसती |
| मरणा भवती खटपट नुसती |
| कोणी हसते कोणी रुसते |
| प्रत्यकाची ही वटवट नुसती. |
| पैका पैका जोडण्यास ही, |
| नाती तुटती तटतट नुसती |
| देण्या केवळ प्रेमास प्रेम |
| हलती हृदये लटलट नुसती |
| भासां मागे रोज धावते |
| पायांची ही फ़टफ़ट नुसती |
Thursday, August 9, 2012
सांजकाळी कशी दाटते,मनात माझ्या हुरहूर.
सांजकाळी कशी दाटते,मनात माझ्या हुरहूर.
कुण्याकाळचा फ़िरुनी येतो,जुन्या स्मृतींचा पूर.
सागराची लाट जणू रुद्र त्सूनामी वादळाची
किती आवरू किती सावरू सये फ़ुटून जातो उर.
दिलीस जेंव्हा हसूनी मजला खोटी वचने तेंव्हा
स्वप्नभूलीत घोड्यानेही चौखूर उधळले खूर.
नेहमीच असतो तसाच आहे आजही येथे मी
तरी आरसा कशास दावी हा जगावेगळा नूर
भूत-भविष्या मध्ये अडकला,क्षणभराचा वर्तमान
किती चाललो तरी रिकामा वाट जाते दूर दूर.
मुक्या जिवाचा मुक्या मनाशी मुकेपणी रोज तंटा
कधी यायचा तुझ्या नि माझ्या गाण्याला एक सूर.
किती चाललो जपून होतो तरीही लागली ठेच
नशीब मेले असेच जाते देऊन हतावर तूर
कुणी कसेही बोलून गेले नि दिले जिव्हारी घाव
किती भोगले अन सोसले असताना मी बेकसूर.
कुण्याकाळचा फ़िरुनी येतो,जुन्या स्मृतींचा पूर.
सागराची लाट जणू रुद्र त्सूनामी वादळाची
किती आवरू किती सावरू सये फ़ुटून जातो उर.
दिलीस जेंव्हा हसूनी मजला खोटी वचने तेंव्हा
स्वप्नभूलीत घोड्यानेही चौखूर उधळले खूर.
नेहमीच असतो तसाच आहे आजही येथे मी
तरी आरसा कशास दावी हा जगावेगळा नूर
भूत-भविष्या मध्ये अडकला,क्षणभराचा वर्तमान
किती चाललो तरी रिकामा वाट जाते दूर दूर.
मुक्या जिवाचा मुक्या मनाशी मुकेपणी रोज तंटा
कधी यायचा तुझ्या नि माझ्या गाण्याला एक सूर.
किती चाललो जपून होतो तरीही लागली ठेच
नशीब मेले असेच जाते देऊन हतावर तूर
कुणी कसेही बोलून गेले नि दिले जिव्हारी घाव
किती भोगले अन सोसले असताना मी बेकसूर.
Wednesday, August 8, 2012
जीवन म्हणजे भातुकलीचा खेळ नाही.
जीवन म्हणजे भातुकलीचा खेळ नाही.
प्रीती म्हणजे चौपाटीची भेळ नाही.
एकच आमुचे आकाश आहे.. एक जमीन.
तरी कसा मग तुझा नि माझा मेळ नाही?
सुख दु:खाचे देणे घेणे राहोच पण,
अंत्ययात्रेस कुणाकडेही वेळ नाही.
आत्मपीडाच दाव म्हणतो कोण शहाणा,
आत्मा म्हणजे सोलायाचे केळ नाही.
ओळख माझी सुधाकरीला चाखून घ्या
देवदार मी रानामधला हेळ नाही.
प्रीती म्हणजे चौपाटीची भेळ नाही.
एकच आमुचे आकाश आहे.. एक जमीन.
तरी कसा मग तुझा नि माझा मेळ नाही?
सुख दु:खाचे देणे घेणे राहोच पण,
अंत्ययात्रेस कुणाकडेही वेळ नाही.
आत्मपीडाच दाव म्हणतो कोण शहाणा,
आत्मा म्हणजे सोलायाचे केळ नाही.
ओळख माझी सुधाकरीला चाखून घ्या
देवदार मी रानामधला हेळ नाही.
Subscribe to:
Posts (Atom)